8.4 C
New York

Mumbai Rain :  मुंबईत अतिमुसळधार! लोकल आणि एक्सप्रेस गाड्या बंद

Published:

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरुच आहे. (Mumbai Rain) मुसळधार पावसासाठी तर पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरलापुढील 24 तासांत रेड अलर्ट देण्यात आलायं. 26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रासह, गुजरात, कोकण, गोव्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्ात आलीयं. मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

मुबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन तासांपासून पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कारण दोन्ही वाहतूक विस्कळीत झाल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धातास उशिराने धावत आहे. विजांच्या कडकडाट अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान सेवा देखील विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडून मुंबईला येणारे विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कुर्ला स्टेशन परिसरात ट्रॅकवर पाणी साचायला सुरवात झाली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शासनाकडून अनुदानात वाढ…

Mumbai Rain गुरुवारी सकाळपर्यंत अलर्ट

IMD ने उद्या सकाळी 8.30 पर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने “25 आणि 26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, 26 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.” IMD ने आपल्या बुलेटिनमध्ये लिहिले आहे की, गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे आणि शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img