16.7 C
New York

Manoj Jarange : अखेर नऊ दिवसांनंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं

Published:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेली नऊ दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावत होती. अखेर त्यांनी आज आपण उपोषण मागं घेत असल्या्ची घोषणा केली आहे. त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही तसंच, यावेळी त्यांनी विनंती केली आहे. (Manoj Jarange) ते म्हणाले, माझं फडणवीस यांना सांगणं आहे की, त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात. उगाच मोठ नुकसान आपलं करुन घेऊ नये असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Manoj Jarange मोठा वर्ग शेती करतो

आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. सर्व मराठा समाजाला तसंच, विनंती आहे की आपण एक रहा. कोणत्याही विषयावर वाद घालू नका. आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे. मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो. त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परिक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठ दु:ख होतं. जरांगे पाटील म्हणाले त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई-बापांना मोठा पश्चाताप अशावेळी होतो असंहीआहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत.

रद्द करण्यात आलेले कृषी कायदे परत आणावेत; अभिनेत्रीची मागणी

फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही जायचं नाही. त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या. उगीच आपलं नुकसान करु नका. जरांगे पाटील यांनी यावेळी मात्र, तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोप नाही असा इशारचं एका प्रकारेदिला आहे. मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे. आपण त्याचा अंत पाहू नये असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.

Manoj Jarange काही दिवसांपूर्वी केला होता आरोप

जाती जातींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो आहे. आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो आहोत. मात्र मी जे आमच्याशी भांडत आहेत त्यांना सांगू इच्छितो की मराठ्यांच्या अंगावरतुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून कुणी येऊ नका. आम्ही आत्ताही तु्म्हाला मानतो आहे आयुष्यभर मानत आहेत. देवेंद्र फडणवीस तुमची काही जहागिरी नाही. तुमचा समाज तुम्हाला मोठं करणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी सगळी षडयंत्रं रचली असा थेट आरोपच काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img