-1.7 C
New York

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण?

Published:

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde Encounter) पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. अक्षयने पोलिसांच रिव्हॉल्व्हर जीपमधून प्रवास करत असताना हिसकावले आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला.या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. याशिवाय, एक पोलीस कर्मचारीही गोळीबारात जखमी झाला आहे. या अक्षय शिंदेचा मृत्यू गोळीबारात झाला. बदलापूरच्या शाळेतील दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती.

या चकमकीत ज्यांच्या गोळीने आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, त्या पोलीस अधिकाऱ्याने एन्काउंटर फेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते अशी माहिती आता समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदेवर ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी गोळी झाडल्याची माहिती आहे. संजय शिंदे यांचा इतिहासही रंजक आहे. त्यांनी गुन्हे शाखेच्या अँटी एक्सटॉर्शन विभागात काम केलं आहे. 1983 मध्ये पोलीस दलात ते रुजू झाले होते. त्यांनी काही काळ चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या बरोबरही काम केले होते.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना वेगळीच शंका

पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्या संजय शिंदे यांचाही समावेश होता. सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी पथकात तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी संजय शिंदे यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img