16.1 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट?

शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप

बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांची हायकोर्टात जनहीत याचिका

“समृद्धी” वरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सिला “ब्रेक” 

समृद्धी महामार्गावर टोलची रक्कम मोठी असूनही टोल नाक्यांवर सुविधा मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी वाहनधारकांनी केल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 69 नोटिसेस बजावल्यावरही टोल वसुली करणाऱ्या कंपनीने आपल्या कामात कुठलेही सुधारणा न केल्याने समृद्धीवरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सीचा कंत्राट आता एमएसआरडीसीने रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांच्या मतांवर भाजपचा डोळा

विधानसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांच्या मतांवर भाजपचा डोळा. भाजप कोअर कमिटी बैठकीत युवा मोर्चा आणि महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी. तरुण आणि महिलांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याची व्यूहरचना. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी दिला जाणार भर.

मुख्यमंत्र्यांनी सोलापुराचा दौरा पुढे ढकलला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या नियोजित असलेला सोलापुराचा दौरा पुढे ढकलला

लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापुरात नियोजित होता कार्यक्रम

मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस महाराष्ट्रमध्ये असल्याने या दोन दिवसात जागा वाटप संदर्भात महत्वाच्या बैठका होण्याच्या शक्यता असल्याने दौरा पुढे ढकलल्याची सूत्रांची माहिती

अमित शहा 62 विधानसभा मतदारसंघातील प्रमुखासोबत साधणार संवाद

देशाचे गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहे. नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीत विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा संवाद साधणार आहे.

लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला मिळालेलं अपयश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी आखली जाणारी रणनीती यावर या बैठकीत विचार मंथन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झालेला वर्धा दौरा आणि आज अमित शहा यांचा नागपूर दौरा हा कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.

मालवण राजकोट येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू

राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे. राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या. शिवपुतळा घाईगडबडीत उभारण्यात आल्याची टीका अनेकांनी केली होती. राज्य शासनाच्या वतीने नव्याने शिवपुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याचा रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img