15.3 C
New York

Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर निघालं, अटी काय?

Published:

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. (Rajkot Fort Shivaji Maharaj Statue)

Shivaji Maharaj Statue अटी-शर्ती काय?

राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला असून, काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.

मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी बदलापूर घटनेत एन्काउंटर; संजय राऊतांची टीका

Shivaji Maharaj Statue सादर करावे लागणार फायबर मॉडेल

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याच्या कामापूर्वी इच्छूक शिल्पकारांना 3 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागणार आहे. यानंतर 4 ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड केली जाणार असून, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

Shivaji Maharaj Statue मोदींच्या हस्ते झाले होते पुतळ्याचे अनावरण

गेल्यावर्षी नौदल दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला. त्यानंतर या प्रकरणात चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना चेतन पाटीलनेच स्ट्रक्चरल डिझाइन केलं होतं. त्यामुळे पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी चेतन पाटीलवरही गुन्हा दाखल केला होता. पुतळा तयार करणारा जयदीप आपटे या तरुणावरही गुन्हा दाखल केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img