16.1 C
New York

Pune Airport : विमानतळावर टपरीवरच्या किमतीत मिळणार चहा अन् पाणी

Published:

सामान्य नागरिकांना विमान टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर हे परवडणारे नसतात. त्यामुळे काही प्रवाशांनी पुणे विमानतळावर कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. पुणेकरांचे हे गाऱ्हाणं आता मार्गी लागलं असून, आता प्रवाशांना विमानतळावर टपरीवरील किमतीत चहा आणि पाणी विकत घेता येणार आहे. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरती याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Airport प्रवाशांचं गाऱ्हाणं काय होतं?

लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर प्रवाशांना चहा सुमारे 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागत होती. हे दर प्रत्येकालाच परवडणारे नव्हते. त्यामुळे मुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता मार्गी लागली आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले ? व्हिडिओ व्हायरल

Pune Airport चहा अन् पाण्यासाठी मोजावे लागणार फक्त 20 रुपये

प्रवाशांच्या या मागणीची दखल घेतल्यानंतर पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनलवर प्रवाशांना चहा आणि पाण्यासाठी केवळ 20 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. काही प्रवाशांना या योजनेच्या अंतर्गत कमी किमतीत चहा, कॉफी आणि पाणी उपलब्ध होणार आहे. विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर एक छोटा स्टॉल सुरू केला जाणार असून, या स्टॉलवर प्रवाशांना पाणी, चहा आणि कॉफी खिशाला परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Pune Airport पुणे विमानतलाचे नामकरण

राज्य सरकारने सोमवारी (दि.23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे (लोहगाव) आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे’ असे करण्याचा निर्णय घेतला. आता राज्य सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. या आनंदाच्या बातमीनंतर आता पुणेकरांना नव्या टर्मिनलवर स्वतःत पाणी आणि चहा, कॉफीचा आनंद घेता येणार आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img