16.1 C
New York

Ulhasnagar : प्रहार जनशक्ती पक्षाचा अनोखा निषेधात्मक निरोप समारंभ

Published:

उल्हासनगर (Ulhasnagar) महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांची आज वसई महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे. डॉ. सुभाष जाधव हे मूळत: पशुधन अधिकारी असून, शासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांची नियुक्ती उल्हासनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून झाली होती. त्यांच्या या पदावर कार्यरत असताना दिव्यांग विभागात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी डॉ. जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिव्यांग निधीचा अपव्यय करून महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळणारी सायकल 20,000 रुपयांना खरेदी केल्याचे तसेच बाजारात 400 ते 800 रुपयांना मिळणारी काठी 8 हजार 200 रुपये आणि 1400 रुपयांना मिळणारी स्टिक 12 हजार रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले ? व्हिडिओ व्हायरल

आज डॉ. सुभाष जाधव यांचा उल्हासनगर महापालिकेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या समारंभाला प्रहार जनशक्ती पक्षाने निषेधात्मक पद्धतीने उत्तर दिले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर महापालिकेसमोर बकरी आणि कोंबड्या आणून तसेच डॉ. जाधव यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निरोप घेतला.

स्वप्नील पाटील यांनी जाहीर केले की, डॉ. जाधव यांची बदली वसई महानगर पालिकेत झाली आहे, आणि तिथे देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ‘जोडे मारत स्वागत’ करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. सुभाष जाधव यांच्यावर लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता असून, दिव्यांग निधीच्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी होण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img