मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारपासून देशभरातून (Monsoon Update) मान्सून माघारी निघाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले असून पाऊस (Maharashtra Rain) बरसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकणी पाऊस होत आहे. काल सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम म्हणून राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार (IMD Rain Alert) बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी आज या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या परिस्थितीचा परिणाम राज्यात होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात (Marathwada) जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, अजित पवारांकडून तयारीचा आढावा
पुढील चार दिवस वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल. तसेच राज्यात अन्य भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड, बीड, परभणी, नांदेड आणी हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.