मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. एका पोलीस कर्मचाऱ्यावर अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन गोळी झाडली होती. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात पोलिसांनी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. (Badlapur ) या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही गंभीर आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केले आहेत.
Sanjay Raut पुरावा नष्ट केला
हे एन्काऊंटर झालं ते कुणाला वाचवण्यासाठी झालं असा थेट प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदूक चालवायला लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यातील आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे म्हणून त्यांनी पुरावा नष्ट केला आहे असा थेट आरोपच संजय राऊत यांनी केला आहे.
नेमका अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला कुठे ?
एक्स या समाज माध्यमावर एक व्हिडिओ संजय राऊत यांनी शेअर केला आहे. अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहे त्यात दिसून येत आहे,.त्यावेळी त्याचे हात बांधलेले असून तोंडावर बुरखा घालण्यात आलेला आहे. यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडलं? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे, फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवं, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut नेमकं काय घडलं?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला काल सायंकाळी सव्वासहा वाजता तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडं आणत होते. वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे अचानक त्याने रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीररीत्या जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात आणण्यात आलं. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.