9.1 C
New York

Junnar News : ओतूरच्या डोमेवाडीत आकाशातून पडला २० किलो बर्फाचा गोळा 

Published:

ओतूर,प्रतिनिधी:( रमेश तांबे )

ओतूर परिसरातील डोमेवाडी येथे दुपारच्या वेळी (Junnar News) आकाशातून वेगाने बर्फाचा मोठा गोळा पडल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली. बर्फाचा हा गोळा नेमका कशामुळे आकाशातून पडला असावा, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. साधारण २० किलोचा हा गोळा असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ओतूर ( ता.जुन्नर ) येथील डोमेवाडी येथे बाबाजी मारुती वाजगे यांच्या शेतात काही मजूर काम करीत होते. त्या वेळी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांनी हा गोळा पडल्याचा आवाज ऐकला. त्याचे तुकडे झाले होते. शेतात काम करणारे मजूर आणि परिसरातील मुलांनी हा गोळा पाहिला. गोळा पडल्याने जमिनीला खड्डा पडला होता. काही मुलांनी तेथील बर्फ खेळण्यासाठी नेला. त्यानंतर येथे बघ्यांची गर्दी जमली.महसूल विभागाला या घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके आणि तलाठी अतुल विभूते यांनी घटनास्थळी दुपारी अडीचच्या सुमारास जाऊन पाहणी केली आणि पंचनामा केला.

विमानतळावर टपरीवरच्या किमतीत मिळणार चहा अन् पाणी

या ठिकाणच्या पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी तज्ज्ञांना पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दुपारी ज्या वेळेला ही घटना घडली, त्या वेळी जुन्नर व आसपासच्या क्षेत्रात गारपिटीसाठी कारणीभूत ढग अस्तिवात नसल्याचे उपग्रहीय चित्रांवरून दिसून येते. त्याचसोबत आसपास गारपीट झाल्याची नोंद नाही. त्यामुळे ही हवामानशास्त्रीय घटना असू शकत नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.सर्वसाधारणपणे गारांचा आकार गोल असतो. त्या आकाराने अगदी खूपच मोठ्या नसतात आणि त्या विखरून पडतात. बर्फाचा असा मोठा तुकडा आकाशातून पडणे, याला वैज्ञानिक आधार नाही. कदाचित एखादे ड्रोन, विमान किंवा हेलिकॉप्टरमधून तो तुकडा पडला किंवा टाकला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. – कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img