16.4 C
New York

Mumbai Pune Expressway : कधी सुरू होणार मुंबई-पुणे नवा महामार्ग?

Published:

पुणे- मुंबई-पुणे या महामार्गावरुन (Mumbai Pune Expressway) अनेक प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील मुंबई ते पुणे प्रवासासाठी चार तासांचा वेळ लागतो. या मार्गावर मोठी वाहतूककोंडी देखील होते. वाहतूककोंडी झाल्यास या मार्गावर चार तासांच्या प्रवासासाठी आणखी तासभरदेखील लागतो. यावर मार्ग पण आता काढण्यात आला असून लवकरच मुंबई-पुणे हा प्रवास प्रवाशांना केवळ दीड तासांत पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात बोलत असताना मुंबई-पुणे या नव्या मार्गाबाबत माहिती दिली.

Mumbai Pune Expresswayमुंबई-पुणे प्रवासासाठी नवा महामार्ग

सध्या मुंबई-पुणे या प्रवासासाठी महामार्गावरुन चार तास लागतात, मात्र आता हे अंतर कमी होणार असून केवळ दीड तासात मुंबई-पुणे अंतर पार पाडता येणार आहे. नव्या महामार्गाविषयी माहिती देण्याआधी गडकरींनी आताच्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेबाबत सांगितलं. ते म्हणाले, ज्यावेळी मुंबई-पुणे महामार्ग बांधला त्यावेळी तो बीओटी तत्वावर बांधण्यात आला होता. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा बीओटी तत्वावर म्हणजे. हा महामार्ग बांधताना आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळेच तो बीओटी तत्वावर उभारण्यात आला होता.

मुख्यमंत्रिपद कोणाला? शरद पवारांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तर

Mumbai Pune Expressway कसा, कुठून असेल नवा मार्ग?

मुंबई-पुणे प्रवास करताना नवा मार्ग हा मुंबईतील अटल सेतूवरुन उतरुन तिथून पुढे पुण्याच्या रिंगरोडपर्यंत असेल आणि तिथून पुढे बंगळुरूपर्यंत हा मार्ग जाईल. या मार्गासाठी ४५ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा नवा महामार्गा बांधण्याच्या कामाची सुरुवात देखील करण्यात आली आहे.

Mumbai Pune Expressway कधी सुरू होणार मुंबई-पुणे नवा महामार्ग?

सुरुवातीला मुंबई-पुणे हा जुना हायवे होता. या महामार्गावर मोठी गर्दी, वाहतूककोंडी असल्याने या हायवेवर मोठा ताण येत होता. त्यामुळे दुसरा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे उभारला. वाहतूककोंडी होत असल्यानेआता त्यावरही मोठी पुन्हा हा नवा मुंबई-पुणे हायवे उभारण्यात येत आहे. रिंगरोडपर्यंत आणि पुढे बंगळुरूपर्यंत अटल सेतूवरुन उतरुन पुढे पुण्याच्या जाणाऱ्या या महामार्गाच्या कामाचं पहिलं पॅकेज एका महिन्यात सुरू केलं जाईल. त्यानंतर पुढील तीन वर्षात या महामार्गाचं काम पूर्ण होऊन मुंबईच्या अटल सेतूवरुन पुण्यात पोहोचता येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img