16.9 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

सुलतानपूर दरोडा प्रकरणात एसटीएफला मोठं यश; एक लाखाचं बक्षीस असलेला अनुज प्रताप सिंग चकमकीत ठार

सुलतानपूर दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय. एक लाखांचे बक्षीस असलेला अनुज प्रताप सिंग लखनऊ एसटीएफ आणि उन्नाव पोलिसांच्या संयुक्त पथकाच्या चकमकीत मारला गेला. अनुजवर सोनाराच्या दुकानात घुसून दरोडा टाकल्याचा आरोप होता. यापूर्वी याच दरोड्यात जौनपूर येथील मंगेश यादव उर्फ ​​कुंभे हा एसटीएफने केलेल्या चकमकीत ठार झाला होता.

शरद पवार यांची आज चिपळूणमध्ये जाहीर सभा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार पक्षफुटीनंतर प्रथमच चिपळूणमध्ये येत आहेत. आज (ता. २३) सकाळी ११ वाजता बहादूरशेख चौक येथील स्वा. सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी (ता. २१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करण्याचे टाळले. त्यामुळे शरद पवार सभेत काय बोलणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे.

संजय घाटगेंच्या निवडीवर आज होणार शिक्कामोर्तब

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदावर आज (ता. २३) माजी आमदार संजय घाटगे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. सकाळी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल. कागल विधानसभा मतदारसंघात निवडणूक न लढवता पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घाटगे यांनी घेतला आहे. या पाठिंब्याचे बक्षीस म्हणून घाटगे यांना जिल्हा बँकेत संधी देण्याचा निर्णय मुश्रीफ यांनी घेतला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img