16.4 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांचा रस्त्याच्या कामावरून संताप

Published:

काही लोक येतात. साथ देतात. काही निघून जातात. त्याची काही चिंता करायची नाही. मी आता येताना इथे बोर्ड पाहिला. (Sharad Pawar) माझ्या नावाचा बोर्ड होता. त्यावर माझा फोटो होता आणि मी येतोय असं लिहिलं होतं. दोन दिवसांपूर्वी इथे सभा होती. एकाने सांगितलं तो येतोय अजून. माझी विनंती आहे की मी येतो म्हणजे आलोय. आता इथून रायगडला जाणार आहे. त्यामुळे मी रोह्याला येतोय की आणखी कुठे येतोय याचा पत्ता लवकरच कळेल. त्याला फारसा वेळ लागणार नाही. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे असं शरद पवार म्हणाले ते चिपळूण येथील जाहीर सभेत बोलत होते.

आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवरही. सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. तो पडला. चौकशी केली. सरकारने आम्हाला काही सांगितलं. एकेकाळी नेव्ही माझ्या हाती होती. मी नेव्हीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलं. राज्य सरकारनं सांगितलं वाऱ्यामुळे पुतळा पडला. मुंबईला शिवाजी पार्कात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इंडिया गेटजवळ पुतळा आहे. हे पुतळे 80 वर्षापूर्वीचे आहेत. समुद्राजवळ आहेत. भरपूर वारा आहे. त्या पुतळ्यांना कधी धक्का बसला नाही. आणि सिंधुदुर्गातील पुतळा पडतो. वाऱ्यामुळे? काय चाललंय हे असा थेट प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केला.

कधी सुरू होणार मुंबई-पुणे नवा महामार्ग?

चार दिवसांपूर्वी पुण्यात अपघात झाला. तुम्ही पाहिलं असेल. पुणे पालिकेचा ट्रक पुण्याच्या रस्त्याने जात होता. तो एका खड्डयात पडला. रस्त्याने जाणारा ट्रक रस्त्यातील खड्ड्यात पडतो. याचा अर्थ या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याची मर्यादा राहिली नाही. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागते. मी गाड्याने प्रवास करतो मला हे माहीत आहे. मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्याची माहिती देणार आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img