मुंबई लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाते. (Mumbai Local Train) चाकरमान्यांचे कामाचे वेळापत्रक हे लोकलवर अवलंबून असते. रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होतापश्चिम रेल्वेवर सध्या सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी सोमवारीही गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून रात्री 11 ते मंगळवार सकाळी साडेपाच या कालावधीत मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे जवळपास 12 लोकलच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
सोमवारी रात्री 10.24 वाजता चर्चगेट-बोरीवली लोकल मालाडपर्यंतच धावेल. विरार-अंधेरी जलद एसी लोकल तर रात्री 10.44 वाजता बोरीवलीपर्यंतच धावणार आहे. रात्री 11.55 वाजता अंधेरी ते भाईंदर एसी लोकल रात्री 11.25 वाजता बोरीवलीहून चालवण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पहाटे 4.05 वाजता वांद्रे-बोरीवली लोकल गोरेगावपर्यंत धावेल. ही लोकल पहाटे 4.38 वाजता गोरेगाव- चर्चगेट जादा धिमी लोकल म्हणून चालवण्यात येणार आहे. सकाळी 8.12 वाजता बोरीवली-विरार लोकल नालासोपाऱ्यापर्यंत चालवण्यात येईल. तर, सकाळी 9.05 वाजता विरार-बोरिवली धिमी लोकल बोरिवली-अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर चर्चगेटपर्यंत धावेल.
मनोज जरांगेंच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा
दिनांक 24 सप्टेंबर रोजी बोरीवली विरार ही लोकल बोरिवली इथून सकाळी आठ वाजून बारा मिनिटांनी सुटणार आहे . ही गाडी नालासोपारापर्यंत धावणार आहे. नालासोपारा स्टेशनवर ही गाडी शॉर्ट केली जाईल तर याच दिवशी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सुटणारी विरार बोरिवली स्लो लोकल बोरिवली अंधेरी वांद्रे दादर मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट मोडणं चर्चगेट पर्यंत धावणार आहे तर चर्चगेट बोरिवली लोकल चर्चगेट हून सकाळी नऊ वाजून 19 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट मुंबई सेंट्रल दादर वांद्रे अंधेरी बोरीवली दरम्यान फास्ट मोडणे नालासोपारापर्यंत धावेल.
बोरिवली-चर्चगेट धीमी वातानुकूलित लोकल पहाटे 4.32 वाजता अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल-चर्चगेटपर्यंत जलद मार्गावर धावेल. पहाटे 4.10 भाईंदर-चर्चगेट जलद लोकल चर्चगेट पर्यंत धीम्या मार्गावर धावेल. पहाटे 4.45 वाजता भाईंदर-चर्चगेट जलद लोकल धीम्या मार्गावर धावेल. सकाळी 7.25 विरार-वांद्रे धीमी लोकल चर्चगेटपर्यंत चालवण्यात येईल. सकाळी 9.23 वाजता चर्चगेट-विरार वातानुकूलित लोकल चर्चगेट-मुंबई सेंट्रल-दादर-वांद्रे-अंधेरी-बोरिवली-भाईंदर-वसई रोड-विरारदरम्यान जलद मार्गावर विरारपर्यंत धावेल.