12.8 C
New York

Bus Accident : मेळघाटमध्ये भीषण अपघात खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी

Published:

अमरावती येथील अतिदुर्गम मेळघाटात भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बस पुलावरुन खाली कोसळली आहे. या अपघातात 50 प्रवासी गंभीर जखमी झाले अपघात इतका भीषण होता की पुल थेट पाण्यात कोसळली असूनआहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अमरावतीतील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. घाटातील वळणाच्या मार्गावरच हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली बस कोसळली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ हा अपघात घडला आहे. सर्व जखमी प्रवाशांवर सेमोडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाट परिसरातील वळण रस्त्यावर हा अपघात घडला आहे. येथील वळणे धोकादायक असून चालकाने वाहनं चालवताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसंच, प्रवाशांसाठी योग्य सूचना फलक आणि रस्त्याची देखभाल आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. मात्र वाहतूक पोलिसांचं जीवघेण्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होतं. या ठिकाणी अनेक रस्ते आड वळणाचे आहेत, जीवघेणी प्रवासी वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन या मार्गावर अधिक सुरक्षा उपाययोजना प्रशासनाने करावी अशी मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली आहे. योग्य सूचना फलक लावावेत आणि रस्त्याची व्यवस्थित देखभाल करावी अशी मागणी देखील करण्यात येते.

कधी सुरू होणार मुंबई-पुणे नवा महामार्ग?

अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. 50 प्रवाशांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नजीकच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांचेही प्राथमिक उपचार सुरू आहेत, परंतु गंभीर प्रवाशांना आणखी उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.

Bus Accident अमरावतीत पावसाचा हाहाकार

अमरावती जिल्हासह विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत विजेच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे या पावसाने सोयाबीन पावसात भिजले आहे सोयाबीन आता कापणीला येणार आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img