3.8 C
New York

Raj Thackeray : पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे भारतात कशासाठी? राज ठाकरेंचा विरोध

Published:

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांच्या मुख्य भूमिका असलेला भारतात प्रदर्शित होणार आहे. मात्र, पाकिस्तानी कलावंतांच्या या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Raj Thackeray) विरोध केला आहे. भारतात प्रदर्शित पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात का होऊ दिले जातात? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळे इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणे हा काय प्रकार सुरू आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये, असे सांगतानाच, बाकीच्या राज्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मविआचं जागावाटप कसं होणार? कुणाला किती जागा, शरद पवार म्हणाले

हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार, असा अप्रत्यक्ष इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, वेळीच पावले उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावे, असे आवाहन राज्य सरकारला करतानाच, कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img