17.4 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

मुंबई विमानतळावरून कोट्यावधींचं सोन आणि हिरे जप्त

मुंबई विमानतळावरून कोट्यावधींच सोनं आणि हिरे जप्त करण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १.५८ कोटी रुपये तसेच १.५४ कोटी रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले. कमरेच्या पट्ट्यात तसेच परिधान केलेल्या कपड्यातून तस्करी सुरू होती.तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एकूण २.२८६ किलो सोन जप्त करण्यात आले आहे, तसेच १३ लाख ७० हजारांच एक रोलेक्स घड्याळ देखील जप्त करण्यात आलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत चालली आहे, त्यांच उपोषण तात्काळ संपावं या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत या मागणीसाठी पुण्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत, आज त्यांच शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे,

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज जनता की अदालत

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज जनता की अदालत आहे. सकाळी 11 वाजता जंतर-मंतरवर जनता की अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केजरीवाल संबोधन करणार आहेत. अरविंद केजरीवाल काय बोलणार याकडे संपूर्ण दिल्लीचे लक्ष लागणार आहे.

गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन बसणार

गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. २६ सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारतमाता, लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत, तर २ ऑक्टोबर रोजी गिरणगावात लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मफतलाल मिलसमोर खटाव मिलची जमीन मिळावी, मफतलाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी, घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टॉवरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरपासून उपोषणाला सुरु आहे जरांगे यांची प्रकृती खालवत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून आज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img