-1.3 C
New York

IND vs BAN : बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत भारताने पहिली कसोटी जिंकली

Published:

टीम इंडियाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या (IND vs BAN) पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशचा डाव या विजयी आव्हानाच्या प्रत्युत्तरात 234 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत (Ind vs Ban) टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांत गडगडला. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स पटकावल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अश्विनने पहिल्या डावात बॅटिंगने धमाका करत कारकीर्दीतील सहावं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही.मात्र अश्विनने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. अश्विनची 5 विकेट्स घेण्याची ही 37 वी वेळ ठरली. अश्विनने यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याच्या 37 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. अश्विनला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

पहिल्या डावात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. रोहित, यशस्वी आणि विराट झटपट बाद झाले. मात्र त्यांतर अश्विनने 113 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 376 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर रोखत 227ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी शतकं केली. त्या जोरावर भारताने दुसरा डाव हा 4 बाद 287 धावांवर घोषित केला. त्यामुळे बांगालदेशला 515 धावांचं अवघड आव्हान मिळालं.

सामन्यातील चौथ्या दिवशी अश्विनने 6 आणि जडेजाने 3 विकेट्स घेत बांगलादेशचा बाजार 234 धावांवर उठवला. बांगलादेशने 4 बाद 158 धावसंख्येपासून चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. नजमूल शांतो आणि शाकिब अल हसन या दोघांनी दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 2 तासांच्या आतच 6 झटके देत ऑलआऊट केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img