17.4 C
New York

Supreme Court : अखेर मुहू्र्त मिळाला! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ‘या’ दिवशी सुनावणी

Published:

राज्यातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्षांत फूट पडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीतून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले. दोघांचेही गट सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला. आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर युक्तिवादही झाला आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात याचिकांवरील सुनावणी रखडली होती. तारखांवर तारखा पडत होत्या. त्यामुळे राजकीय पक्षांत अस्वस्थता वाढली होती. सुनावणी कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. आता अखेर या सुनावणीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या मंगळवारी (24 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

Supreme Court सिंघवी यांचे प्रयत्न

आमदार अपात्रता प्रकरणावर तारखेवर तारखा पडत होत्या. आधी 18 सप्टेंबरची तारीख सुनावणीसाठी ठरली होती. त्यानंतर सुनावणीची तारीख 22 ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिवाय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. सुप्रीम कोर्टात मंगळवार 24 सप्टेंबरची तारीख त्यामुळे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण मेन्शन केल्यानंतर पडली आहे.

Supreme Court निवृत्तीपूर्वीच ऐतिहासिक निकाल?

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वीच चंद्रचूड हे ऐतिहासिक निकाल देणार का? याचं सर्वांनाच कुतुहूल लागलं आहे. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निकाल आले आहेत. मात्र ठाकरे गटाचं प्रकरण अत्यंत क्लिष्ट असल्याने या प्रकरणावरील निकाल माईलस्टोन ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चंद्रचूड हे पदावर असतानाच निकाल येणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Supreme Court मुख्यमंत्री- सरन्यायाधीश एकाच मंचावर

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच मंचावर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या प्रस्तावित इमारतीचं 23 सप्टेंबरला भूमीपूजन होणार आहे. भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश 23 सप्टेंबरला एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उच्च न्यायालयाची नवी इमारत उभी राहत आहे. 24 सप्टेंबरला विशेष बाब म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीची तारीख आहे. मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश त्याच्या एक दिवस आधीच एकाच मंचावर येणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img