18.8 C
New York

World Peace Day : का साजरा केला जातो जागतिक शांतता दिन? जाणून घ्या

Published:

जगभरातील हिंसा आणि संघर्ष टाळून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला (World Peace Day) जातो. संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी 21 सप्टेंबर (United Nations) रोजी हा दिवस साजरा केला जातो. जगभरात विविध उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. जागतिक शांतता दिवस आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. पहिला आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर 1982 रोजी साजरा करण्यात आला होता.

हा निर्णय जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा मानला गेला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी हा दिवस साजरा करण्यात येत होता. नंतर यामध्ये बदल करण्यात येऊन 21 सप्टेंबर हाच दिवस यासाठी निश्चित करण्यात आले. व्यक्ती, समाज आणि देशांना अधिक शांतीपूर्ण न्यायपूर्ण जगाच्या दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे खास महत्त्व आहे. Cultivating a Culture of Peace या वर्षातील शांतता दिवसाची थीम अशी आहे.

World Peace Day शांतता दिन कधी सुरू झाला ?

जागतिक शांतता दिनाची सुरुवात सन 1981 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती. दोन दशकांनंतर 2001 मध्ये महासभेने सर्वानुमते या दिवसाला अहिंसा आणि युद्धविराम कालावधीच्या रुपात नामित करण्यासाठी मतदान केले होते. हिंसेच्या विरोधात आवाज उठवणे आणि या समस्यांवर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी जागतिक शांतता दिन प्रोत्साहन देतो. लोकांमध्ये शांततेबाबत जागरुकता आणणे आणि शांतिपूर्ण समाज तयार करण्याच्या कामात आजच्या दिवसाचे योगदान आहे.

World Peace Day जागतिक शांतता दिनाची थीम

सन 2024 मधील आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम खास आहे. Cultivating a Culture of Peace अशी ही थीम आहे. या वर्षात जगभरात ठिकठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांची माहिती देते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img