24.7 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात एक मोठा अपडेट

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका उद्या घ्याव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीने सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांची मागणी केली. आता 24 सप्टेंबरला सिनेटची निवडणूक होणार असून 27 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा फीसकटली

मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यचा बेमुदत संप अटळ असणार आहे. २४ सप्टेंबर २०२४ पासून हे लोक संप करणार आहेत.

स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

धारावीमध्ये धार्मिक स्थळाचा भाग तोडण्यावरून स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोवर पालिकेच पथक परत जाणार नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही एस्थानिकांची भूमिका

धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

धारावीमध्ये धार्मिक स्थळाचा भाग तोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बीएमसीच्या पथकाच्या गाडीची तोडफोड झाली आहे. दगडफेक देखील झाल्याची माहिती आहे.

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आज जिल्हा बंदची हाक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे.उपोषणाच्या समर्थनार्थ आज शनिवारी (ता. २१) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img