आज पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या नाम फाउंडेशनचा (Naam Foundation) 09 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्या भाषणाची स्टाईल बदलवणारा मास्टर माईंड नाना पाटेकर (Nana Patekar) आहे अशी कबुली दिली.या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 09 वर्षात नाम फाउंडेशनने राज्यात जे परिवर्तन घडवून दाखवलं. अनेक वेळा समाजात लोकांचे मत असं असते की, परिवर्तन घडविण्यासाठी सरकारची गरज असते मात्र अनेक वेळा समाजाने दाखवून दिलं आहे की, सरकार पेक्षा जास्त इफेक्टिव्ह परिवर्तन हे समाज घडवू शकतो. नाना सारखी मकरंद सारखी जी मंडळी आहे ही मंडळी परिवर्तन घडवू शकतात.
2014 मध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा राज्यात मोठा दुष्काळ आला होता. राज्याचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की देशातील सर्वात जास्त मोठी धरणे ही महाराष्ट्रात आहे तरीही महाराष्ट्र दुष्काळी आहे आणि तो दुष्काळीचं राहणार आहे. कारण राज्याचा 55 टक्के भाग हा अवर्षणप्रमण आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी सोल्युशन फक्त मोठी धरणे नाही. जेव्हापर्यंत आपण पाण्याचा शेवटचा थेंब जमिनीत पोहोचवणार नाही तो पर्यंत आपण राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही असं या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विधानसभेसाठी ‘वंचित’ ची पहिली यादी जाहीर
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात नाना पाटेकरांची फॅन फॉलींग खूप जास्त आहे आणि त्याचा त्यांनी योग्य उपयोग केला. आज एक हजार पेक्षा जास्त गावात नाम फाउंडेशनने वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आहे. नेतृत्व म्हणजे काय असतो जो लोकांना प्रेरीत करू शकतो आणि लोकांमध्ये जिंकण्याची जिद्द तयार करू शकतो तो खरा नेता असतो. ही जिंकण्याची जिद्द जे लोकं हरले होते ज्या लोकांना असं वाटत होतो की आमच्या जीवनात काही फार उरलं नाही त्यांच्यासाठी नाम फाउंडेशनने जबरदस्त काम केलं असेही यावेळी ते म्हणाले.
तसेच माझ्या भाषणाची स्टाईल बदलण्याचा काम देखील नाना पाटेकर यांनी केला आहे अशी कबुली देखील या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील उपस्थित राहणार होणार होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. राज्यातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी 2015 ही सामाजिक संस्था स्थानप केली होती.