18.8 C
New York

Maha Vikas Aghadi : मविआचे जागा वाटप अंतिम ! काँग्रेस-ठाकरे प्रत्येकी शंभर जागा लढणार?

Published:

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागा वाटपांचे गुऱ्हाळ सुरू आहे. जागा वाटपाबाबत दोन्ही आघाड्यांमध्ये अंतिम चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत आज शुक्रवारी मुंबईत बैठक झाली आहे. त्यात काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे गट या दोघांना प्रत्येकी शंभर जागा दिल्या जातील, अशी चर्चा झाल्याची माहिती काही वृत्तवाहिनांनी दिलीय.

60 टक्के पूर्ण महाविकास आघाडीचे जागावापट जवळपास झाले आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 288 जागांपैकी प्रत्येकी शंभर जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादीला 84 जागा शरद पवार यांच्या दिल्या जाणार आहेत. तर चार जागा या मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष निवडून तर विशाल पाटील हे आलेले आहेत. ते काँग्रेसमध्येच सहभागी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या आधारावर काँग्रेसने 125 जागांची मागणी केली होती. परंतु आता काँग्रेसला शंभर जागाच दिल्या जाणार आहेत. तर ठाकरे यांच्या गटाला शंभर जागा मिळणार आहे. शरद पवारांना केवळ दहाच जागा तर लोकसभेला मिळाल्या होत्या. त्यात पवारांचे आठ खासदार निवडून आले आहे. लोकसभेला पवारांनी जागा वाटपात पडती बाजू घेतली होती. तर ते विधानसभेला कमी जागा घेऊन लढणार आहेत.

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थगित

Maha Vikas Aghadi विदर्भाच्या जागांवर रस्सीखेच

मविआमध्ये 80 टक्के जागा वाटपावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. या भागात काँग्रेसने भाजपला बॅकफूटवर टाकले आहे. तर अनेक माजी आमदार हे काँग्रेसमध्ये आले आहेत. विदर्भात काँग्रेस सर्वाधिक जागा मागत आहेत. त्यामुळे येथील जागांबाबत तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या जागांबाबत चर्चा झालेली नाही. इतर भागातील जागा विदर्भ सोडून वाटपांबाबत चर्चा झाली आहे. 130 जागांवर मविआतील पक्षांमध्ये एकमत झाले आहे. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा मिळणार आहे. पण इतर जागांवर ज्या पक्षाची ताकद त्यांना जागा दिली जाईल. काही जागा अदलाबदली केल्या जाणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img