प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) आणि त्यांची पत्नी जुली लिबर-राठी यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं आहे. ध्रुवने सोशल मीडियावर पोस्ट करून या आनंदाची बातमी दिली आणि आपल्या नवजात मुलाच्या गोंडस फोटोंसह हा आनंद साजरा केला. त्याने लिहिलं, “आमच्या लहान बाळाचं जगात स्वागत. ध्रुव आणि जुलीने नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न केलं होतं, आणि या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना मुलगा झाला आहे
ध्रुवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर या खास क्षणांचे फोटो शेअर करताच, अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केलं.
ध्रुव राठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच त्याची सोशल मीडियावर एल्विश यादवसोबतच्या भांडणाची बरीच चर्चा झाली होती. ध्रुव अनेकदा त्याच्या यूट्यूब व्हिडिओंमध्ये ट्रेंडिंग विषयांवर तथ्यांबद्दल बोलतो. ध्रुव राठीचे लाखो चाहते आहेत. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.