8.5 C
New York

Sharad Pawar : निवडणुकीआधी घड्याळाचा फैसला करा; शरद पवारांची न्यायालयात याचिका

Published:

राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या (Maharashtra Politics) तयारीने वेग घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (MVA) जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता अजित पवार गटाचे (Ajit Pawar) टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसन अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. दोन्ही गटांना दोन नवीन निवडणूक चिन्हे द्या अशी मागणी करणारी याचिका शरद पवार (Sharad Pawar) गटाने न्यायालयात दाखल केली आहे.

न्यायालयाने ही याचिका तातडीने सूचीबद्ध करावी अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती. त्यानुसार याचिका सूचीबद्ध करण्यात आली असून या याचिकेवर येत्या 25 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याआधी राष्ट्रवादीत फूट पडली होती. अजित पवार आमदारांना घेऊन बाहेर पडले. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने दिला होता. शरद पवार गटाला नवीन नाव आणि तुतारी फुंकणारा माणूस निवडणूक चिन्ह मिळालं.

पावसाचा जोर वाढणार! चार ते पाच दिवसात मुसळधार बरसणार

या नवीन चिन्हासह शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांना चांगलं यश मिळालं. शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकच जागा मिळाली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खरा पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने आव्हान दिलं होतं.

आता या प्रकरणात निकाल येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्ह द्यावं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections 2024) असल्याने चिन्हाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकी आधी पक्षचिन्हाबाबत निर्णय होणं गरजेचं आहे. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं. घड्याळ चिन्हाचा फायदा एकाच गटाला व्हायला नको, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img