18.8 C
New York

Senate Election : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थगित

Published:

आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. (Senate Election) मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) सिनेट निवडणुक (Senate Elections) पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. निवडणूक स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर ही निवडणुक स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत ही निवडणुक स्थगित करण्यात आली.

विशेष म्हणजे दोन दिवसांनी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी सिनेट निवडणुकीसाठी मतदान होणार होते. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि अभाविप यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र अचानक ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. दोन दिवसांवर सिनेट निवडणूक असतांना ही निवडणूक स्थगित झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

Senate Election पत्रकात काय म्हटलं?

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016(10) च्या कलम 28(2)(न) [28(2)(t)] प्रमाणे (10) नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाची निवडणुकीची निवडणूक अधिसूनचा 3 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत होती, असं या पत्रकात म्हटलं.

उपरोक्त निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर संघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.निवडणुकीसाठी संबंधित मतदार, उमेदवार, नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी, मतदान केंद्रांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

Senate Election कोंबड झाकलं म्हणून सुर्य उगवायचं राहत नाही- शरद पवार गटाची टीका

पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला. एकदा नव्हे तर दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 2 दिवसांवर असताना स्थगित करण्यात आली. निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील, अशा घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकचं म्हणावसं वाटतं की, कोंबड झाकलं म्हणून सुर्य उगवायचं राहत नाही, सूर्योदय होणार म्हणजे होणारच!, अशी टीका शरद पवार गटाने केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img