17.6 C
New York

Rahul Gandhi : अमेरिकेतून भारतात परतताच राहुल गांधींनी केलं आश्वासन पूर्ण

Published:

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) काल सकाळी अचानक करनाल जिल्ह्यातील गोगडीपूर गावात पोहोचले. तेथे त्यांनी एका कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना तेथे त्यांची अमित नामक युवकाशी भेट झाली होती. बेरोजगारीला कंटाळून त्याने अमेरिकेत अवैधरीत्या घुसखोरी (डंकी मार्गाने) केली होती. आता तो भारतात परतू शकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना भेट देण्याचं आश्वासन राहुल यांनी शुक्रवारी पूर्ण केलं.

Rahul Gandhi आश्वासन केलं पूर्ण

अमितने अमेरिकेत आश्रय मागितल्यानंतर तो मिळाला. पण, आता त्याला भारतात परतायचं तर नियमानुसार तसं करता येत नाही. दरम्यान, राहुल यांनी अमेरिकेत त्याची भेट झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना हरयाणात भेटायला जाईन, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार राहुल शुक्रवारी पहाटेच ५ वाजता अमितच्या कुटुंबीयांच्या घरी पोहोचले.

मविआचे जागा वाटप अंतिम ! काँग्रेस-ठाकरे प्रत्येकी शंभर जागा लढणार?

मध्यंतरीच्या काळात राहुल यांनी अनेक युवकांची भेट घेतली होती, जे बेरोजगारीला कंटाळून गैरमार्गाने अमेरिकेत पोहोचले आणि आता ते तेथेच अडकले. आपण हा प्रश्न संसदेत उपस्थित करूत ज्यामुळे केंद्र सरकार नक्कीच यातून मार्ग काढू शकेल, असं आश्वासन राहुल यांनी अमितच्या आणि अमेरिकेत अडकलेल्या इतर तरुणांच्या कुटुंबीयांना दिलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी २५ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत. विधानसभा प्रचारादरम्यानच ते या व्यावसायिकांशी संवाद साधतील, असं जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रमुख संजय सप्रू यांनी सांगितलं.

Rahul Gandhi सकाळी काँग्रेसमध्ये, संध्याकाळी भाजपमध्ये

केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे भाऊ जगदीश यांचे पुत्र रमित खट्टर यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, संध्याकाळ होता होता ते परत भाजपमध्ये परतले. ‘आपण तर चहापानासाठी गेलो होतो,’ असा खुलासा रमित यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img