17.6 C
New York

Dharavi Violence : मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद चिघळला; धारावीत तणावपूर्ण स्थिती

Published:

मुंबईतील धारावीत सध्या (Dharavi Violence ) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं जातय. धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं. तसंच, बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

निवडणुकीआधी घड्याळाचा फैसला करा; शरद पवारांची न्यायालयात याचिका

Dharavi Violence नेमकं प्रकरण काय?

धारावीच्या परिसरात एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचं पथक हा अवैध भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. बीएमसीचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसंच, बीएमसीच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसंच, काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत.

Dharavi Violence खासदार वर्षा गायकवाड यांचं पत्र

काल म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी या मशिदीच्या संबंधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात धारावीतील हिमालया हॉटेल जवळची मेहबुबे सुभानिया मशिदवरील तोडक कारवाई करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवली आहे. सदरची मशिद ही अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. धारावी पुनर्वसन प्राधिकरण (DRP) कडून या मशिदीच्या अतिक्रमणाबाबतची चौकशी करावी, सदरहू मशिदीच्या अतिक्रमणाबाबतचा DRP चा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुढील निर्णय घेता येईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img