19.7 C
New York

Ajit Pawar : विधानसभेला अजितदादा मुस्लिम कार्ड खेळणार ?

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळं सर्व पक्ष जागावाटपाची चर्चा करत आहेत. अशातच अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (NCP) एक मोठी अपडेट समोर आली. विधानसभा निवडणुकीत अजितदादा गट राज्यात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचा हिंदुत्ववादी राजकारणाचा सूर शिगेला पोहोचला. मात्र, महायुतीचा घटक असलेल्या अजितदादा गटाने मुस्लिम उमदेवारांना संधी द्यायचं ठरवलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून राज्यात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे. अजितदादा गटाने महायुतीच्या जागावाटपात त्यांच्याकडे येणाऱ्या जागांपैकी 10 टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेनंतर अजितदादाकडून मुंबईतील चार आणि एमएमआर रिजमध्ये आणखी एक अशा पाच जागांवर मुस्लिम उमेदवार उभे जाणार आहे.

मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीला चार जागा सुटणार असल्याची माहिती आहे. या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे. तसेच, प्रत्येक प्रादेशिक प्रभागात एक मुस्लिम उमेदवार उभा करण्याचा अजितदादा गटाचा विचार आहे.

नाना पटोलेंनी मविआच्या जागावाटपाचा फॉर्मुला सांगितला

Ajit Pawar मुंबईतील कोणत्या जांगावर मुस्लिम उमेदवार?

अजितदादा गट विधानसभा निवडणुकीत वांद्रे, मुंबादेवी, अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे. तर कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातही मुस्लिम चेहरा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितलं की, नवाब मलिक यांची कन्या सना मलिक अणुशक्ती मतदारसंघातून, नवाब मलिक यांना शिवाजीनगर मतदारसंघातून, झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून आणि नाझिम मुल्ला यांना कळवा-मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. तर मुंबादेवी मतदारसंघातील अजितदादा गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.Ajit Pawar मुंबईतील कोणत्या जांगावर मुस्लिम उमेदवार?

दरम्यान, नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भाषा वापरत आहेत. यामुळे अजितदादा गट नाराज झाला. अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते नितेश राणेंविरोधीत थेट भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले की, जे दिल्लीत आमच्याबद्दल तक्रार करतात त्यांनी गणेश मिरवणूकीवर झालेल्या दगडफेकीवर आक्षेत घेत त्याचा निषेध करायला हवा होता. पण, त्यांनी तसं केल नाही, असं राणे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img