19.7 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली, योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल झाले आहेत. ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वात थोड्याच वेळात सिल्वर ओक येथे पक्षांतर्गत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील शरद पवारांना देणार आहेत. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागांवरील वादावर चर्चा झाल्यानंतर ही बैठक होणार आहे.

 पुणे-कोलाड रस्त्यावरील लवळे फाट्यावर अपघात, वाहनांचं नुकसान

पिरंगुट (ता. मुळशी) : येथील पुणे-कोलाड रस्त्यावर लवळे फाटा येथे आज सकाळी अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येथील घाट उतरताना स्टील घेऊन चाललेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असून त्यात एक कार, एक टँकर आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. .चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. आज सकाळी आठ वाजता हा अपघात झाला.

आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे मार्ग बदलले

आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर बुधवारी रात्री कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या २६ वॅगन्स रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात 500 मीटर रुळाचे नुकसान झालेय. ट्रॅकवरील 800 स्लीपरही तुटले. अपघातानंतर वंदे भारत, राजधानीसह ३४ गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, 42 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरकडे खुलासा मागितला

दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरकडून बायोमेट्रिक नमुने घेतल्याबद्दल खोटी साक्ष दिल्याबाबत UPSC च्या आरोपावर खुलासा मागितला आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, UPSC ने पूजावर खोटी साक्ष दिल्याचा आरोप केला. तर, पूजा खेडकरच्या वकिलांनी UPSC ने दबाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक रणनीती आखल्याचा दावा केला आहे. न्यायालयाने २६ सप्टेंबरच्या सुनावणीपूर्वी खुलासा करण्याचे निर्देश दिले आ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img