21 C
New York

iPhone 16 : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील स्टोरबाहेर लांबच लांब रांग

Published:

आजपासून बहुप्रतिक्षित आयफोन 16 (iPhone 16 Series) भारतात दाखल झाला आहे. अशातच देशभरातील आयफोन (IPhone Lovers) प्रेमींनी अॅपल स्टोअरबाहेर (Apple Store) गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे, मुंबईत आयफोन-16 (Mumbai Apple Store) खरेदी करण्यासाठी पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

iPhone 16 21 तासांपासून लांब रांगेत

या नवीन आयफोन सीरीजची एकच क्रेझ दिसून आली. उज्ज्वल शाह हा ग्राहक गेल्या 21 तासांपासून रांगेत उभा आहे. तो काल सकाळी 11 वाजता आलेले आहे. आज सकाळी 8 वाजता स्टोरमध्ये जाणारा तो पहिला व्यक्ती होता. आपण उत्साहित असून या क्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. गेल्यावेळी आयफोन 15 खरेदीसाठी तो 17 तास रांगेत होता. यावेळी गर्दी अधिक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. कंपनीने 9 सप्टेंबर रोजी या वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमात इट्स ग्लोटाईम या टॅगलाईन खाली AI फीचर्ससह आयफोन 16 सीरीज लाँच केली होती.

iPhone 16 भारतीय ग्राहकांना दिला सुखद धक्का

गेल्यावेळी ॲप्पल कंपनीने देशात मुंबई आणि दिल्लीत दोन स्टोर उघडले होते. आयफोन भारतात तयार होत असल्याने त्याची किंमत कमी असेल असा गेल्यावेळी ग्राहकांचा अंदाज होता. पण त्यांच्या उत्साहवर कंपनीने पाणी फेरले होते. पण यंदा ॲप्पलने भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला. कंपनीने पहिल्यांदाच जुन्या सीरिजपेक्षा आयफोन स्वस्तात बाजारात उतरवला आहे. कंपनीच्या इतिहासात ही पहिलीच घटना ठरली आहे. गेल्यावर्षी कंपनीने आयफोन बाजारात उतरवला होता. यावेळी किंमत अधिक असेल असे गणित मांडण्यात येत होते. पण कंपनीने किंमत तर वाढवलीच नाही. पण सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

iPhone 16 काय आहे किंमत

iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन मॉडल बाजारात उतरवण्यात आले आहे. ते Ultramarine, Teal, Pink, White आणि Black या रंगात मिळतील. या सीरीजमध्ये 128GB, 256GB, आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. iPhone 16 ची सुरूवातीची किंमत 79,900 आणि iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे.

तर iPhone 16 Pro (128GB) ची सुरुवातीची किंत 1,19,900 रुपये आहे. तर iPhone 16 Pro Max (256GB) ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे. आयफोन 16 मध्ये 6.1 इंच आणि आयफोन 16 Plus मध्ये 6.7 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन ब्राईटनेस 200 Nits आहेत. कॅमेरा कॅप्चर बटन देण्यात आले आहे. यामध्ये A18 चिपसेट देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img