एकीकडे राज्यात विधानसभ निवडणुकांसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, पुढचं सरकार कुणाचं येणार यावर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. मात्र, निवडणुकांपूर्वीच राज्याचे विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर (Narendra Modi) डिमोशन झाले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या चर्चांना सुरूवात झाली आहे. (Jitanram Manzhi Speech In Wardha Maharashtra)
Eknath Shinde नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.20) वर्धा दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्धटन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) भाषण झाले. त्यानंतर भाषण करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितनद्रराम मांझी यांना आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी भाषणाच्या सुरूवातीला मांझी यांनी मोदी, राज्यपालांसह मंचावरील प्रमुख नेत्यांचे स्वागत केले. हे स्वागत करत असताना मांझी यांनी शिंदेंचा उल्लेख मुख्यमंत्री करण्याऐवजी उपमुख्यमंत्री असा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा
Eknath Shinde राज्याचा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. त्यात नुकतंच महायुतीतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपलाच नेता हवा अशा भावना व्यक्त केल्या आहेत. यात राष्ट्रवादीपक्षातर्फे अजितदादा मुख्यमंत्री व्हावे असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. तर, भाजपकडून गिरीश महाजन यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फडणवीस असल्याचे म्हणत शिंदेंचा पत्ता कट केला होता. त्यामुळे आगामी काळात जर पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं तर, नेमकी मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माक्ष, निवडणुकांच्या निकालापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी भर मंचावर विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख उपमुख्यमंत्री असा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde गरज सरो वैद्या मरो अशी भाजपची नीती
राज्यातील सत्तांतरानंतर विरोधकांकडून भाजपनं शिंदेंना सोबत घेत सत्ता स्थापन केली. एवढेच काय तर त्यांनी मुख्यमंत्री पदही दिलं. हे होत नाही तोच अजितदादांनी बंड करत राष्ट्रवादीत उभी फुट पाडली आणि तेही सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर विरोधकांकडून वेळोवेळी शिंदेंचं पद जाणार जाणार अशा चर्चांना तोंड फोडलं होतं. एवढेच नव्हे तर, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरदेखील शिंदेंचे पद जाणार असल्याच्या चर्चांचे पेव फुटले होते. मात्र, तसे काही झाले नाही. पण, असे जरी झाले नसले तरी, गरज सरो आणि वैद्य मरो अशीच भाजपची खेळी आहे. त्यामुळे शिंदे आणि अजितदादांची गरज संपली की भाजप या दोघांनाही खड्यासारखं बाजूला सारेल असा दावा विरोधकांकडून वेळोवेळी केला जात आहे.
Eknath Shinde शिंदे केवळ नावचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे हे केवळ नावा पुरते मुख्यमंत्री असून, सर्व निर्णय हे भाजप नेत्यांकडूनच घेतले जातात असेही वेळोवेळी विरोधकांकडून सांगितले जाते. त्यात आता खुद्द मोदींसमोर केंद्रीय मंत्री मांझी यांनी भरमंचावर विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चुकीने का होईना पण उपमुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने विधानसभानंतर शिंदेंचा पत्ता कट होणार की, त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.