28.9 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात भीषण आग

लोखंडवाला सेकंड क्रॉस लेन येथील दोन बंगल्यांना सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बंगल्याच्या तळमजल्यावर आग लागल्याने बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग नेमकी कशाने लागली हे अद्याप स्पष्ट नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंग चे काम सुरू आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार करणार महाराष्ट्र दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या २१ तारखेपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अजित पवार आढावा घेणार आहेत. अजित पवारांनी विधानसभानिहाय आमदारांशी चर्चा केली आहे.

वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार

वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती पाच राज्यांचा दौरा करणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे. ही समिती मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरूमध्ये बैठका घेणार असून हा दौरा 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होईल. जेपीसी सदस्य पाच राज्यांतील अल्पसंख्याक विभागांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत आणि वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करून वक्फ विधेयकाबाबत चर्चा करणार.

 मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस,अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून, त्यातच ओबीसी आंदोलकांनी गणिमी काव्यानं अंतरवाली सराटी मध्ये उपोषण सुरु केलंय.. त्यामुळं दोनही उपोषणला भेट देण्यासाठी गर्दी होणार आहे.. त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा म्हणजे अंतरवाली फाट्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला. दरम्यान आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील वडीगोद्री येथे थोड्याच वेळात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img