-1.3 C
New York

Ind Vs Ban : पहिल्या सामन्यात झालं असं की लिटन दासवर भडकला पंत

Published:

भारत विरुद्ध बांगलादेश (Ind Vs Ban) यांच्यातील पहिल्या टेस्टला चेन्नईत सुरुवात झाली. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. एका पाठेपाठ तीन विकेट्स पडल्या. मात्र, यशस्वी जयस्वालने आघाडी कायम ठेवली. सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबत भारतीय संघाच्या डावाला आकार देण्याच काम त्यानं केलं. पण अर्धशतकी भागीदारीनंतर ही जोडी फुटली. रिषभ पंत ३९ धावांवर बाद झाला. पहिला टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला.

Ind Vs Ban अन् लिटन दासवर भडकला पंत

टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी 16 व्या ओव्हरला मैदानात भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात वाद पाहायला मिळाला.या सामन्यात रिषभ पंत आणि बांगलादेशचा विकेट किपर लिटन दास यांच्यात शाब्दिक चकमकीसह एक वादग्रस्त सीन पाहायला मिळाला. रिषभ पंत बांगलादेशी खेळाडूवर चांगलाच भडकल्याचे दिसून आले. दोघांच्यात घडलेली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात पंत रागारागाने बांगलादेश विकेट किपरला जाब विचारताना दिसते. “उसको फेंको ना भाई मुझे क्यों मार रहे हो” (चेंडू त्याच्याकडे टाक, मला कुठं मारतोस) ही पंतची कमेंट स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

लिटन दास याने चेंडू पकडल्यावर तो यष्टीवर मारण्याऐवजी पंतला लागला असावा. त्यामुळेच पंत रागात त्याला सुनावल्याचे दिसते. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. ज्यामुळे ऋषभ पंत रागावला. यावेळी ऋषभ पंत विकेटच्या मागे उभ्या असलेल्या लिटन दासला रागावून म्हणाला, “त्याच्या जवळ टाक ना भाऊ, मला का मारतोय’. आता या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Ind Vs Ban ऋषभ पंतचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन :

भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कर अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत तब्बल 15 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. ऋषभ पंतने पूर्णपणे बरा झाल्यावर आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img