28.9 C
New York

Sharad Pawar : लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा होईल? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहिना 1500 रुपये देण्यात येत आहेत. विरोधकांकडून या योजनेवरून टीका करण्यात येत असतानाच या योजनेवरून महत्त्वाचे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. त्यांनी या योजनेचा महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत किती फायदा होईल? याबाबत स्पष्ट सांगितले आहे. पवारांनी याबाबतची आपले मत एका वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. (Sharad Pawar expressed his clear opinion about Ladki Bahin Yojana)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मुलाखतीत लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्या, आता तिसरी टर्म सुरू आहे, इथे येऊन योजनेचे कौतुक करून गेले, त्या काळात त्यांना बहि‍णींच्या व्यथा अन् दु:ख दिसले नाही का? उद्धव ठाकरेंच्या सरकारचा काळ सोडता इथे त्यांची सत्ता आहे, त्या काळात बहि‍णींचे दु:ख दिसले नाही का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. पण लाडकी बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

…तर उलटं टांगलं असतं; आमदार बोरनारेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराबाबात शरद पवार म्हणाले की, राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील. पण रोजचे वर्तमान पत्र बघितले तर स्त्रीयांवर अत्याचार ही बातमी नित्याचीच झालेली आहे आणि ती क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थाने बहि‍णींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, वाढलेले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तर, लाडकी बहीण योजनेचे पैसे एक कोटी आणि अधिक महिलांना वाटल्याचे म्हणतात. अजून दोन हप्ते देतील. लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही होणार नाही. समाजात, लोकांच्यात, बहि‍णींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, महागाई, स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाच्याबाबत भरीव कामगिरी आहे असे काही दिसत नाही, या गोष्टींचा बहीण विचार करेल असे दिसते, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. तसेच, मी गावागावात जातो, मेळावा घेतो, बहि‍णींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षाने मांडतात, लाडकी बहीणचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचे राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img