7.2 C
New York

Jayant Patil : बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा मविआत यावं, जयंत पाटील यांची खुली ऑफर…

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhasabha Election) पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje), राजू शेट्टी आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पुढाकार घेत तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केलेत. यासंदर्भात एक बैठकही घेण्यात आली. दरम्यान, राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असतांनाच आता शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत येण्याचे आवाहन केले आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. पुण्यातील तिसऱ्या आघाडीच्या बैठकीबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, बच्चू कडू यांनी तिसरी आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं, अशी आमची इच्छा आहे. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात आम्ही एक आघाडी तयार केली आहे. पण, आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहे. त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळं अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास असल्याचं पाटील म्हणाले.

फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; ‘त्या’ वृत्तानंतर राष्ट्रवादी आक्रमक

पुढं ते म्हणाले, बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी पाटील यांनी एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, भाजप एक देश, एक निवडणूक लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ते म्हणावं, तितकं सोपं नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका सरकारला सात टप्प्यांत घ्याव्या लागल्या. याचा अर्थ सरकार एकाच वेळी निवडणुका घेऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे, असं पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img