मालाड स्थानकाच्या पश्चिमेला मार्गिका गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान (Western Railway) सहाव्या मार्गिकेसाठीउभारण्यात आली असून त्यावरून रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. यामुळे आधीचा फलाट आणि आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या फलाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ज्यामुळे आता ही गर्दी कमी करण्यासाठी फलाट क्रमांक एकच्या शेजारी तात्पुरता पोलादी (स्टील) फलाट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मालाड रेल्वे स्थानकात होणारी गर्दी विभागली जाणार आहे. यासाठीच्या नियोजनासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. (Western Railway Another platform to be constructed at Malad railway station)
मालाड रेल्वे स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. 17 सप्टेंबर) बैठक पार पडली. या बैठकीत स्थानकातील गर्दीच्या विभाजनासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पश्चिमेकडे पोलादी (स्टील) फलाट उभारण्यात फलाट क्रमांक एकच्या येणार आहे. दोन ते तीन महिन्यांत हा तात्पुरत्या स्वरूपाचा फलाट पूर्ण केला जाणार आहे. पायाभूत सुविधांचे काम स्थानकातील पूर्ण झाल्यावर तो हटवण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले. तसेच, गर्दी विभागण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी फलाट क्रमांक एक-दोनवरील गर्दीच्या वेळी धावणाऱ्या लोकल एकाच वेळी फलाटावर येणार नाही, उपाययोजना याबाबत राबवण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा होईल? शरद पवार स्पष्टच म्हणाले…
गर्दी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, मालाड स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पुलावरील प्रवाशांना उतरण्यासाठी 1.40 मीटर रुंदीच्या पायऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या पुलावरील 1.65 मीटर रुंदीच्या पायऱ्यांचा वापर प्रवाशांकडून करण्यात येत आहे. फलाटावरील प्रवासी वर्दळीसाठी अधिक मोकळी जागा निर्माण व्हावी, यासाठी काही फलाटावरील तिकीट आरक्षण केंद्रासह अन्य बांधकामे हटवण्यात येणार आहेत. स्थानक परिसरात त्यांची उभारणी करण्यात येईल. बांधकामाधीन डेक आणि बांधकामाधीन तिकीट आरक्षण केंद्र यांमध्ये आणखी एक जिना उभारण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.