12.8 C
New York

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीत विसर्जन

Published:

मुंबईचा मानाचा गणपती असलेला लालगबाच्या (Lalbaugcha Raja Visarjan) राजाला भाविकांनी निरोप दिला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या शेवटची आरती करत , लालगबाच्या राजाला लालबागच्या राजाचा विजय असो, असा जयघोष करत भाविकांनी निरोप दिला आहे. राजाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते. राजाला तराफ्यावर बसवून अत्यंत जड मनाने भाविकांनी त्यांच्या लाडक्या राजाला अखेर निरोप दिला आहे. काल सकाळी लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर आता अखेर भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप दिला आहे. लालगबाच्या राजासोबतच इतर गणेश मूर्ती देखील गिरगाव चौैपटीत दाखल झाल्या होत्या. यावेळी गिरगाव चौपाटीवर अलोट जनसागर जमला होता. लालबागचा राजाची आरती सुरु असताना गिरगाव चौपाटीवरील वातावरण अक्षरश: भारले होते.

Lalbaugcha Raja Visarjan लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात विसर्जन

हायड्रॉलिक्सचा वापर यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja ) खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 22 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झालेला पाहायला मिळाला नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती. तब्बल 23 तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात विसर्जन करण्यात आले. बाप्पााला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Lalbaugcha Raja Visarjan राज्यात चोख पोलीस बंदोबस्त

पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कंबर कसली होती. मोठ्या उत्साहात, थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img