26.6 C
New York

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

Published:

जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत (Jammu and Kashmir Assembly Election)आहेत. घाटीतून कलम 370 हटवल्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काश्मीरची जनता आज ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होतेय. यातील पहिला टप्पा आजपासून सुरु झाला असून यात 7 जिल्ह्यांच्या 24 विधानसभा जागांवर निवडणुका होतायत. यात एकूण 219 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 3 हजार 276 पोलिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत.

Jammu and Kashmir Assembly Election पोलीस आणि सेना जवानांची सुरक्षा

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत काश्मिरी पंडीतदेखील मतदान करण्यासाठी उतरले आहेत. 35 हजारहून अधिक विस्थापित काश्मीरी पंडिंतांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून व्यक्तिगत रुपात मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या प्रवासी काश्मीरी मतदारांना 24 मतदान केंद्रात ही सुविधा मिळेल. निवडणूक शांततापूर्ण पार पाडावी यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत

काश्मीरमधील 47 विधानसभा मतदारसंघांसाठी सरासरी पाच अपक्ष उमेदवार आहेत. जम्मू विभागात ही संख्या प्रति मतदारसंघात 2.93पर्यंत आहे. बांदीपोरामध्ये निवडणूक रिंगणातील 20 उमेदवारांपैकी 11 अपक्ष आहेत. दोडा पश्चिम, नौशेरा आणि रामगडमध्ये प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार आहे. तर, बुधल, कांगण, रामनगर आणि सिरीगुफ्वारा-बिजबिहारा या चार विधानसभा मतदारसंघात एकही अपक्ष उमेदवार नाही.

Jammu and Kashmir Assembly Election राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

या निवडणुकीतील अपक्षांच्या संख्येवरून पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळाही उडत आहे. काश्मीरमध्ये मतांचे विभाजन करण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले असल्याने आम्ही आमच्या मतदारांना त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी सचेत करत आहोत. काश्मिरींचा राजकीय आवाज मजबूत असावा, असे केंद्रातील एनडीए सरकारला वाटत नाही, असा आरोप पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

गंडरबल आणि बडगाममधून निवडणूक लढवणारे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला तसेच काँग्रेसनेही हाच सूर लावला आहे. आपला आवाज दाबण्यासाठी भाजपाने मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गंडरबलमध्ये 15 उमेदवारांपैकी सात अपक्ष आहेत. तर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने भाजपा घाबरली आहे. आता त्यांच्याकडून ही युती तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी भाजपा अपक्षांना निवडणूक रिंगणात उतरवत आहेत.

भाजपाने मात्र हा आरोप फेटाळताना, विरोधकांना प्रत्यु्त्तर दिले आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे, त्या प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. निवडणूक रिंगणातील अपक्षांबाबत नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस हे खोटा प्रचार करत आहेत. हे पक्ष आधीच आपल्या पराभवाची कारणे शोधत असल्याचा पलटवार काश्मीरमधील भाजपाचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img