-1.7 C
New York

 Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला मोठ्या भक्तीभावाने निरोप

Published:

सोनेरी मयुरपंखी रथाला गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट ( Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) आणि त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि भंडारा उधळत काढण्यात आलेल्या दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी अनंत चतुर्थीला आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते रंगारी बाप्पाची पुजा व आरती झाली. त्यांनतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाड्यातून मयुरपंखी रथातून बाप्पा महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. याठिकाणी प्रथा परंपरेनुसार टिळकांच्या पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींना ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली.

विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक रथाला ओढणाऱ्या बैलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी रथासाठी बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला होता. 132 वर्षांनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र रथ तयार करण्यात आला होता. सोनेरी आकर्षक असे मयुरपंखी रथ मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होता. उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या रथाचे सारथ्य केले. साधारण पहाटे सव्वा तीनच्या सुमारास प्रत्यक्ष मिरवणुकिला सुरवात झाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगरा मिरवणुकीत पुढे होते. तर मर्दानी खेळांच्या पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याच बरोबर समर्थ, शिवमुद्रा आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह आणखी वाढला.

लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीत विसर्जन

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाराची उधळण केली जात होती. तर मिरवणूक मार्गावरील गणेश भक्तांकडून फुलांची उधळण केली जात होती. तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. सकाळी साडेसात वाजता टिळक चौकात मयूरपंखी रथ आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी साडे आठच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. तसेच कमीत कमी वेळेत ही मिरवणूक संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या संपूर्ण उत्सवात पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार असं यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img