26.9 C
New York

Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ छाटू नका तर, चटके द्या; सेनेनंतर आता भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Published:

बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून वाद उफाळलेला असतानाच आता भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीदेखील राहुल गांधी यांच्या यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे.

Rahul Gandhi जीभ छाटणं चुकीचं पण चटके आवश्यक

शिवसेना खासदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर, त्यांची जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे मग ते राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे बोंडे म्हणाले. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे असे बोंडे म्हणाले.

Rahul Gandhi आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासीसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधी यांच्या मनातील ओठावर आलं. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असं म्हणत राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ असं म्हटले होते. त्यानंतर राजकारण तापलेले असतानाच गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये कलम 192 , कलम 351 (2), कलम 351 (4), कलम 351 (3) अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img