3.6 C
New York

Amit Shah : ‘वक्फ’ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयक लवकरच मंजूर; अमित शाहांनी दिले संकेत

Published:

वक्फ बोर्डाच्या (Waqf Board Bill) मालमत्तांच्या संरक्षणासाठी सरकार कटीबद्ध असून पुढील दिवसांत वक्फ बोर्ड बिल संसदेत मंजूर करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी घोषित केलंय. दरम्यान, एनडीए सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाल्याने एनडीए सरकारच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमित शाहा बोलत होते.

अमित शाहा म्हणाले, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मालमत्तेचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून पुढील दिवसांत हे बिल मंजूर करण्यात येणार असल्याचं अमित शाहा म्हणाले आहेत. दरम्यान, मागील महिन्यांत वक्फ बोर्ड बिल लोकसभेत मांडण्यात आलं. या विधेयकामध्ये तरतुदींवर विरोधकांनी आक्षेप घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर हे विधेयक चौकशीसाठी संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं.

बुलडोझर कारवाई बंद होणार,सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

८ ऑगस्ट रोजी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. त्यामध्ये वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी केंद्रीकृत पोर्टलसह अनेक महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त, मुस्लिम महिला आणि गैर-मुस्लिम सदस्यांच्या प्रतिनिधित्वासह केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड तयार करण्याचे सुचवत आहे. 14 सप्टेंबर रोजी एका मुस्लिम संघटनेचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार तारिक अन्वर यांनी या विधेयकाला विरोध केला होता. हे विधेयक अप्रत्यक्षपणे मुस्लिम धार्मिक संपत्तीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img