8.3 C
New York

Mahayuti : महायुतीमध्ये जागावाटपावर तिन्ही नेते एकमत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Published:

विधानसभेसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीकडून (Mahayuti) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. तसेच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबत देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी महायुतीमध्ये जवळपास 70 टक्के जागांवर एकमत झाले असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महायुतीकडून उमेदवारांची नावे घोषित होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जागा वाटपासाठी 80 किंवा 90 अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह महायुतीमध्ये तिन्ही नेत्यांनी धरलेला नाही. जेथे अजित पवारांना वाटते त्यांचे उमेदवार जिंकू शकतात तेथे त्यांचा आग्रह आहे तसेच जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह आहे आणि जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू, आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचे सूत्र निश्चित केले असून जवळपास 70 टक्के जागांवर महायुतीमध्ये एकमत झाले आहे असं माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच आमच्या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून जिंकण्याचे सूत्र निश्चित केले होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दहशतवादाला खोलवर गाडून टाकू अन्…, अमित शहांचा काश्मीरमध्ये शब्द

तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील यावेळी त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे सत्ता दिली मात्र ते कधी मंत्रालयात गेले नाही, विधानभवनात गेले नाही आणि हे आता जुनी पेन्शन देऊ असे खोटे बोलत आहेत. आमचे सरकार सगळे प्रश्न सोडवत आहे असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी गायकवाड यांचे समर्थन करत माही. आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाले होते. नेहरू, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी अशा काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होते ते ओठात आले आहे. जरांगे पाटील यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img