23.1 C
New York

Reliance Jio : Jio चं नेटवर्क डाऊन,युजर्सना करावा लागतोय समस्यांचा सामना

Published:

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Reliance Jio चं नेटवर्क गेल्या 1 तासापासून ठप्प आहे. त्यामुळे युजर्सना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयावर अनेकांनी याबाबत पोस्ट करत Reliance Jio ला टॅग केलं आहे. गेल्या 1 तासापासून Reliance Jio चं नेटवर्क डाऊन आहे.

त्यामुळे Jio युजर्सची अनेक कामं रखडली आहेत. एका युजरने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे की, IDC (डेटा सेंटर) मध्ये लागलेल्या आगीमुळे जिओ सेवा बंद झाली आहे. येथे दुरुस्तीचं काम सुरु आहे. लवकरच नेटवर्क सुरळित होईल. मात्र अद्याप Reliance Jio ने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे युजर्स नेटवर्क कधी सुरळित होणार याबाबत विचारणा करत आहेत.

कर्जावरील ईएमआय कम होण्याची शक्यता, RBI गव्हरर्नचे संकेत?

Reliance Jio ची सेवा बंद झाली आहे. बहुतांश युजर्सच्या मोबाईलमध्ये सिग्नल येत नाही. Down detector वर इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये 20 टक्के लोकांनी व्यत्यय आल्याची नोंद केली आहे. 14 टक्के लोकांना Jio फायबर चालवताना अडचणी येत आहेत. Reliance Jio ची वेबसाइट देखील योग्यरित्या काम करत नाही आणि वापरकर्ते Jio ॲपमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

12 वाजण्याच्या सुमारास डाउनडिटेक्टरवर 10 हजारांहून अधिक तक्रारी आहेत. दिल्ली, लखनौ आणि मुंबई सारख्या शहरांमधून आउटेजच्या समस्या अधिक नोंदल्या गेल्या आहेत. देशभरातील युजर्स जिओची सेवा बंद असल्याच्या तक्रारी करत आहेत. X वर Jio देखील खाली ट्रेंड करत आहे. लोक जिओसाठी मीम्स शेअर करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img