8.8 C
New York

Manoj Jarange : जरांगे पाटील सहाव्यांदा बसले उपोषणाला

Published:

अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील (Manoj Jarange) हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. उपोषणस्थळी राज्यभरातून मराठा समाज एकवटला आहे. आताची संधी ही सरकारसाठी शेवटची संधी आहे, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार आम्हाला जाणूनबजून आरक्षण देत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अखेरचा इशारा देत जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. काल मध्यरात्री पासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे.

माध्यमांशी बोलताना, ”मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा जीआर सरकारने लवकरात लवकर काढावा. तसेच हैदराबाद, सातारा आणि बोंबे गॅझेट हे लागू करावे. आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. मला राजकारणात यायचं नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा. शिंदे समितीने २४ तास केले पाहिजे. तीनही गॅझेट लागू करावेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो , कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे.

लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार; गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही. राजकारणावर एक शब्द बोलणार नाही. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. दरम्यान गेले अनेक महिने मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. सगेसोयरेची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच आरक्षणावरून ते सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. आरक्षण न दिल्यास २८८ उमेदवार द्यायचे की पाडायचे हे ठरवणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img