-6.9 C
New York

Atishi Marlena : आज मी दुःखी, माझे अभिनंदन करू नका; आतिशींची प्रतिक्रिया

Published:

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी (Atishi Marlena) यांची निवड झाल्यानंतर आता त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मिळालेल्या संधीबाबत त्यांचे गुरू आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहे. यावेळी आतिशी म्हणाल्या की, आज मी जितकी आनंदी आहे तितकीच दुःखी आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीतील जनता खूप दु:खी असून, मुख्यमंत्री झाल्याबद्दल माझे अभिनंदन करू नका. हार घालू नका असे आतिशी यांनी म्हटले आहे.

आतिशी होणार दिल्लीच्या नव्या CM, 11 वर्षांनंतर पुन्हा महिलेच्या हाती राजधानीची कमान

Atishi Marlena काय म्हणाल्या आतिशी?

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या आतिशी म्हणाल्या की, “सर्वप्रथम मी अरविंद केजरीवाल यांचे आभार मानते ज्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला यासाठी माी माझे नेते आणि गुरू केजरीवाल यांचे मनापासून आभार मानले. त्या पुढे म्हणाल्या की, पहिल्यांदाच आमदाराला मुख्यमंत्री बनवले जाते हे फक्त आम आदमी पक्षामध्येच हे घडू शकते. केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला याचा मला खूप आनंद आहे, त्यासोबतच आज अरविंद केजरीवाल राजीनामा देत आहेत याचेही मला दु:ख असल्याचे आतिशी म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img