8.9 C
New York

Ganesh Visarjan : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’; आज गणरायाला धुमधडाक्यात निरोप

Published:

मागील १० दिवसांपासून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाचे (Ganesh Visarjan ) ज्या जल्लोशात आगमन झाले, त्याच उत्साहात बाप्पाला निरोप देण्याची तयारी मंडळांकडून करण्यात येत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे.

Ganesh Visarjan गृह खात साध्या वेशात

पारंपरिक वेशभूषेसह नाशिक ढोल, पुणेरी ढोल, लेझीम पथक आदींचे नियोजन, लगबग अनेक मंडळांकडून सुरू आहे. दरम्यान, अनेक मोठ्या शहरांत गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांची छेडछाड होऊ नये गृह खात्याने साध्या वेशातील पोलीस उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी म्हणून हजारोंच्या संख्येने पोलीस आणि हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

याचबरोबर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून मोठ्या शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहणांना प्रवेश बंदी घातली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, अहमदनगर अशा शहरांमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Ganesh Visarjan विसर्जनावर ड्रोन, सीसीटीव्हीची नजर

अनंत चतुर्थीला होणारे सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन आणि बुधवारी (ता. १८) आलेला ईद ए मिलाद सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याची ग्वाही सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे. पुरेपूर मनुष्यबळासह ड्रोन आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरातील प्रमुख विसर्जन स्थळे, महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांमधील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img