राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी (ता.16 सप्टेंबर) सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतना अनेक प्रश्नाची उत्तरे दिले. तसेच, यावेळी त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर स्वतःच्या शैलीत उत्तर दिले. शरद पवारांनी टीका केली होती की, ‘लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन काही होणार नाही. त्यांची अब्रू वाचविणे गरजेचे आहे,’ यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “हो हे 100 टक्के बरोबर आहे. कोणाचेही सरकार असेल, बहिणींची अब्रू वाचविणे हे महत्त्वाचेच आहे. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री,गृहमंत्री झाले, जेवढे सरकारे आली, त्यांना प्रत्येकांनाच कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असते. आम्ही पण करतो आहोत,” असे उत्तर देत महिला सुरक्षेबाबत सहमती दर्शवली. (Ajit Pawar on Ladki Bahin yojna and women safety issues)
“लाडकी बहीण योजना ही ग्रामीण भागात जास्त प्रसिद्ध झाली आहे.” असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी एक उदाहरण देताना महिला सुरक्षासंदर्भात गैरफायदा घेण्याचे प्रकारही घडतो असेही सांगितले. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, ‘मला गुलाबी रंगाची गरज नाही, पांढरा रंगच बरा,’ यावर अजित पवार म्हणाले की, “पांढरा रंग हा स्वच्छ आणि चांगला असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ते योग्यच आहे,”
Ajit Pawar जागावाटपासंदर्भात काय म्हणाले अजित पवार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये, “स्ट्राईक रेटवरून जागावाटपासंदर्भात निर्णय होईल,” अशी प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, “जे प्रमुख व्यक्ती आहेत, त्यांना जे काही वाटेल ते म्हणण्याचा अधिकार आहे. सगळे जण सांगतील आणि नंतर अंतिम निर्णय होईल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच,निवडणूक दोन टप्प्यात होणार अशी चर्चा होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, “निवडणुकीबद्दल मला काहीच माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही. थोडी कळ काढा, ज्यावेळेस निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतील तेव्हा आपल्याला कळेलच. सध्या गणेशोत्सव सुरु आहे, त्यामुळे कुठले दर्शन राहिलेले असेल ते घ्या. बाप्पाचा आशीर्वाद घ्या.” अशी प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला अजित पवार
“आज मुंबईमध्ये लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला आलो. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळी आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाही. राज्यात सुख समाधान शांती सर्वांची भरभराट होऊ दे, भले होऊ दे, अशीच मागणी बाप्पााकडे केली आहे. राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. जी काय मदत राज्याकडून किंवा केंद्राकडून करायचे असेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या परिस्थितीमधून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,” अशी भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.