8.5 C
New York

Sharad Pawar : अद्यापही आपली वेळ मिळालेली नाही, मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचे पत्र

Published:

स्पर्धा परीक्षांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार भेट घेणार आहेत. मात्र त्यांना अद्याप भेटीची वेळ मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठविले असून ते पत्र शरद पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Sharad Pawar wants appointment with CM Shinde regarding students’ issues) राज्यात 32 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांची भरतीप्रक्रिया वेळेवर व्हावी तसेच वेळेवर नियुक्त्या मिळाव्यात, हीच एकमात्र अपेक्षा असते. परंतु सद्यस्थितीत रखडलेल्या नियुक्त्या, अनेक परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली असल्याचे शरद पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.

Sharad Pawar मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या आहेत.

राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी आयबीपीएस परीक्षा ऑगस्ट 2024मध्ये नियोजित असलेल्या येत असल्याने राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी तसेच राज्यसेवेच्या परीक्षेत कृषीच्या 258 जागांचा समावेश करावा, आयोगाने परीक्षा या मागण्यांसाठी पुणे येथे स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु परीक्षा पुढे ढकलत असताना परीक्षा नेमकी कधी घेण्यात येईल, याबाबत तसेच कृषी सेवेच्या जागांबाबत स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले नव्हते. आज जवळपास तीन आठवडे उलटूनही आयोगाने परीक्षेची तारीख घोषित केलेली नाही तसेच कृषीच्या जागांसंदर्भात देखील निर्णय घेतलेला नाही. आचारसंहिता लागण्याची शक्यता ऑक्टोबर महिन्यात असल्याने या संदर्भात त्वरित निर्णय घेण्यात यावा.

संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब, गट-क) दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात आयोजित होते, परंतु यंदा या परीक्षेसंदर्भात अद्यापही काहीही ठोस प्रक्रिया करण्यात आलेली नाही. तरी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या तसेच जाहिरातीत पदांची वाढ करण्यात यावी.

राज्यसेवा, कृषी सेवा, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर सहाय्यक वगैरे सरळ सेवेतील अनेक पदांवर निवड होऊन बराच कालावधी उलटूनही पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत तरी रखडलेल्या नियुक्त्यांचा आढावा घेऊन पात्र विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्ती आदेश द्यावेत.

7000हून अधिक जागांची भरती लिपिक पदांकरीता यासह काही अन्य भरतीप्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांत अडकलेल्या आहेत, त्यावर त्वरित निर्णय घ्यावा.

राज्यात शिक्षक तसेच प्राध्यापकांच्या देखील बहुतांश जागा रिक्त असल्याने रिक्त जागांचा नव्याने आढावा घेऊन शिक्षक भरती तसेच प्राध्यापक भरतीला देखील गती द्यावी.

जरांगे अन् माझे चांगले संबंध, त्यांनी मुंबईत यावे चांगला शेवट करू; शिंदेंच्या शिलेदारीची ग्वाही

राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून यासंदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे, परंतु अद्यापही आपली वेळ मिळालेली नाही, असे सांगतानाच, तरुणवर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता वाढत्या बेरोजगारीमुळे असून प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेऊनदेखील त्यांच्या मागण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही होत नसल्याने हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठी आपल्या व्यग्र कार्यक्रमांतून तातडीने वेळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img