3 C
New York

Pune : पुणे हादरलं! भरदिवसा वाळू व्यावसायिकावर गोळीबार, दोन जणांना अटक

Published:

पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसात गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने पुण्यात (Pune) कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील साळवे नगरमध्ये एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार घडल्याची घटना घडली आहे. 15 दिवसांपूर्वी झालेल्या वादातून व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोंढवा गंगाधाम रोड येथील श्री दत्त वाळू सप्लायर्सचे दिलीप गायकवाड (Dilip Gaikwad) यांच्यावर साळवे नगरमध्ये गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिलीप गायकवाड यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु केला आहे.

माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु आहे. हा हल्ला पूर्व नियोजित होता की अचानक घडला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Pune सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला

तर काही दिवसापूर्वी पुण्यात भाडणं सोडवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकावर एका तरुणांकडून कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता. या हल्लात सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (Ratnadeep Gaikwad) जखमी झाले होते.

रामटेकडी (Ramtekdi) परिसरात भांडण सुरु होते ते भाडणं सोडवण्यासाठी आणि एकाला अटक करण्यासाठी पोलीस तिकडे गेले होते मात्र त्यावेळी निहाल सिंग टाक याने वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला होता. निहाल सिंग टाक याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहे.

या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लक्ष घालून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी निहालसिंग टाकला अटक केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img